भांडण सोडविणाऱ्याला मुलीवर चाकूने हल्ला; बापावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news family Dispute stabs girl Filed crime against father nagpur
भांडण सोडविणाऱ्याला मुलीवर चाकूने हल्ला; बापावर गुन्हा दाखल

भांडण सोडविणाऱ्याला मुलीवर चाकूने हल्ला; बापावर गुन्हा दाखल

नागपूर : आईसोबत भांडण करीत असताना मुलीने मध्यस्थी करीत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापून बापाने चाकुने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. मानसी शालीकराम बावने (२३) रा. तारकेश्वर नगर असे जखमी मुलीचे नाव आहे. पोलिसांनी मानसीच्या तक्रारीवरून वडील शालीकराम सोमाजी बावणे (५०) विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

कपिलनगरच्या तारकेश्वरनगरात शालीकराम कुटुंबासह राहतो. त्याला दारूचे व्यसन आहे. तो रोज रात्री दारूच्या नशेत घरी येऊन पत्नीशी वाद घालतो. शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला आणि पत्नीला शिवीगाळ करून वाद घालू लागला. आई-वडिलांना भांडताना पाहून मुलगी मानसी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न करू लागली. ती वडिलांना समजावून शांत करण्याचा प्रयत्न करू लागली.

मात्र यामुळे शालीकराम आणखीच संतापला. आधीच दारूच्या नशेत असलेल्या शालीकरामला समोर मुलगी आहे याचेही भान राहिले नाही. त्याने चाकू काढून मानसीवर हल्ला केला. तिच्या पाठीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी शालीकरामला आवरून पोलिसांना घटनेची माहिती दिली. मानसीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कपिलनगर पोलिस घटनास्थळावर पाहोचले. मानसीच्या तक्रारीवरून आरोपी वडील शालीकराम विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.

Web Title: Crime News Family Dispute Stabs Girl Filed Crime Against Father Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top