Crime news : व्याघ्र प्रकल्पातील टायगर पॅराडाईज रिसॉर्टवर पोलिसांचा छापा

अश्लील नृत्यः डॉक्टर, व्यापाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
Police raid
Police raidsakal

नागपूर : उमरेड कऱ्हांडला-पवनी व्याघ्र प्रकल्पातील टायगर पॅराडाईज रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकत तेथे अश्लिल नृत्य करणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. यामध्ये बडे व्यापारी आणि काही डॉक्टरांचाही समावेश आहे.

अभयारण्याच्या आसपास अनेक रिसॉर्ट आहेत. अशाच एका ‘टायगर पॅराडाईज रिसॉर्ट’ मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी डीजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत, तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करणाऱ्या नृत्यांगनांवर काही डॉक्टर व व्यापारी पैसे उधळताना आढळले. पोलिस पाहताच अनेकांचे धाबे दणाणले. काहींनी पळ काढल्याचेही समजते. एक आरोपी सर्वांना दारू पुरवित होता, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र वाघ यांनी दिली.

Police raid
Nagpur : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अनेक कैद्यांकडे मोबाईल ; दहशतवाद्यांच्याही हाती...

याप्रकरणी पोलिसांनी ललीत नंदलाल बॆस(वय ५०, रा. खात रोड भंडारा, अभय रमेश भागवत (४९, रामायण नगरी खातरोड भंडारा) गोपाल सत्यनारायन व्यास (४८,भंडारा) पंकज तुलसीराम हाठीठेले (३६ समतानगर जरिपटका नागपूर) मनीष ओमप्रकाश सराफ(४७, एमआयडीसी, वर्धा), समीर कमलाकर देशपांडे (५५,सुरेंद्रनगर नागपूर) रजत विनोद कोलते (३२,रा कोदामेढी, मौदा) मंगेश सुरेश हर्डे (३८, खरबीरोड नंदनवन नागपूर) आशुतोष शेषराव सुखदेवे (२८, शिवनगर खामला, नागपूर) केशव रवींद्र तरडे (३५,कोदामेंढी, मौदा) पारस ज्ञानेश्वर हाठीठेले (२६, जमील लेआउट गोधनी नागपूर) अरुण अभय मुखर्जी (४७, मनीषनगर नागपूर) यांच्यासह सहा नृत्यंगणा यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास उमरेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे यांचे मार्गदर्शनात पो. उपनिरीक्षक रवींद्र वाघ करीत आहेत.

घटनास्थळावरून जप्त केलेला माल

ध्वनी उपकरणे डीजे-१ लाख ६० हजार, स्मोक मशीन, स्टेबलायझर, साउंड लेव्हल मशीन,एम्लीफायर, साउंड मिक्सर, दोन लॅपटॉप, रॉयल स्टॅ्ग विदेशी दारु, रॉयल चॆलेंज विदेशी दारु, ब्लॅक अॅड व्हाईट विदेशी दारु, नगदी १ लाख ३० हजार.

Police raid
Nagpur : OBC कार्यकर्त्यांच्या शिबिराला शरद पवार यांच्यासह अजित पवार हेसुद्धा उपस्थित राहणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com