esakal | लहान मुलांनी केला चोराचा पाठलाग; आईचे दागिने वाचविले!
sakal

बोलून बातमी शोधा

लहान मुलांनी केला चोराचा पाठलाग; आईचे दागिने वाचविले!

लहान मुलांनी केला चोराचा पाठलाग; आईचे दागिने वाचविले!

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : बारा वर्षांचा भूषण आणि दहा वर्षांचा लहानगा भाऊ सानिध्य शनिवारी आई-बाबा मार्केटला गेल्याने घराच्या छतावर खेळत होते. नेमकी हीच संधी साधत चोरटा त्यांच्या घरात शिरला. घरात काय सुरू आहे याची दोन्ही भावंडाना कल्पना नसावी. चोरट्याने सोन्याचे दागिणे बॅगेत भरले जणू काही झालेच नाही अशा थाटात बाहेर पडला. मात्र, वर खेळणाऱ्या दोन्ही भावंडांची नजर चोरट्यावर पडली. हा माणूस आपल्या घरातून आला म्हणजे नक्कीच चोर असावा असा संशय त्यांना आला. दोघेही हिम्मतवान! आरडाओरड न करता भूषण आणि सानिध्य यांनी सायकलने चोराचा पाठलाग सुरू केला. (Crime-News-theft-news-Save-jewellery-nad86)

चोरटा पायीच जात असला तरी त्याची नजर या दोघांवर होती. तब्बल तीन किलोमीटरपर्यंत दोघेही चोराच्या मागे मागे गेले. हा चोरटा कोकराच्या काळजाचा निघाला. दोघांना पाहून त्याने बॅग रस्त्यावर फेकली अन् पळ काढला. भूषण आणि सानिध्य यांच्या चतुराईमुळे आईचे दागिणे चोरीला जाण्यापासून वाचले.

हेही वाचा: ‘...अन्यथा तुझ्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकून देईल’

चित्रपटाच्या कथेप्रमाणे ही घटना आहे. सुरेश जिवतोडे (गिट्टीखदान) हे जीएसटी विभागात कार्यरत आहेत. त्यांना भूषण (१२) आणि सानिध्य (१०) दोन मुले आहेत. शनिवार असल्यामुळे सुरेश हे पत्नीसह डीमार्टमध्ये खरेदी करायला गेले होते. दोन्ही भावंडे घराच्या छतावर खेळत होते. दरम्यान एक चोर घरात शिरला. त्याने घरातील सोन्याचे दागिने बॅगेत भरले आणि दारातून निघत होता.

भूषण आणि सानिध्य यांची नजर त्या चोरावर गेली. चोरट्यानेही त्यांना बघितले. दोघांनीही घाईघाईत खाली उतरून सायकली काढल्या. चोर ज्या दिशेने गेला, त्या दिशेने ते निघाले. बऱ्याच अंतरावर त्यांना तो चोरटा दिसला. त्यांना जवळ येताच चोरट्याने लगेच बॅग फेकली आणि गल्ली-बोळातून पळायला लागला. मुलांनी सायकल थांबविल्या आणि बॅग घेतली. घरी परत जाण्यासाठी निघताना मात्र ते रस्ता विसरले. अंदाज घेऊन जात असताना ते थेट गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचले.

काही सूचत नसल्याचे बघून तेथ बसस्थानकावरील एका बाकावर बसले. पोलिस उपनिरीक्षक मनीष गोडबोले हे कर्तव्य बजावताना त्यांना मुले दिसले. पीएसआय गोडबोले यांच्याकडे त्यांची आस्थेने विचारपूस केली. ते दोघेही घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे त्यांनी एपीआय वडस्कर यांना बोलावले. दोन्ही मुलांनी घडलेला प्रकार सांगितला. पीएसआय गोडबोले यांनी मुलांना पोलिस ठाण्यात आणले आणि त्यांच्या पालकांना फोन करून बोलावून घेतले. दोन्ही मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या दोन मुलांनी दाखविलेली समयसूचकता आणि हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(Crime-News-theft-news-Save-jewellery-nad86)

loading image