
बुलडाणा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन २०२३-२४ च्या खरीप आणि रब्बीच्या हंगामातील ४५३ कोटी रुपयांपैकी ४२९ कोटी रुपयांच वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. उर्वरित २४ कोटी रुपये तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर २०२४-२५ हंगामातील पीक विम्याचे १४४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर उर्वरित निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना आज २९ एप्रिल रोजी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत दिली.