नागपूर - शहरातील महाल परिसरात सोमवारी उसळलेला दंगलीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील मुस्लिम बहुल परिसरात मोठा बंदोबस्त लावून ११ पोलिस ठाण्यात ‘कर्फ्यु’ लावण्यात आला.
दरम्यान घटनेच्या चौथ्या दिवशी पोलिसांकडून शहरातील कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ ठाण्यात कर्फ्यु कायम ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी काढले आहेत. या आदेशात नंदनवन आणि कपिलनगर ठाण्याच्या परिसरातील कर्फ्यु उठविण्याचे आदेश देण्यात आले आहे.
औरंजेबाच्या कबरीच्या वादातून एक गटाने केलेल्या निषेध आंदोलनानंतर सोमवारी दुपारपासून महाल परिसरात तणावाचे वातावरण होते. सायंकाळी सात वाजतनंतर एक समुदायातील काही युवकांनी भालदारपुरापासून निघून महाल परिसरात वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक सुरू केली.
यावेळी पोलिसांच्या आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार आणि अश्रूधूर सोडण्यास सुरुवात केली. मात्र, मोठ्या प्रमाणात युवक शस्त्रासह रस्त्यावर उतरल्याने पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी बराच वेळ लागला. रात्री उशिरापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू करीत आरोपीची धरपकड सुरू केली.
या प्रकारानंतर पोलिसांनी मंगळवारी आदेश काढून परिमंडळ चार आणि पाचमधील अकरा पोलिस ठाण्यातंरग्त परिसरात संचारबंदी लावण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून परिसरात शांतता असल्याने पोलिसांनी लावलेल्या बंदोबस्ताचा आढावा घेत, शहरातील कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ ठाण्यात कर्फ्यु कायम ठेवण्याचे आदेश दिले. या भागात नागरिकांनी शिस्तीचा भंग केल्यास त्यांच्यावर २२३ अंतर्गंत कारवाई करण्यात येणार आहे.
नंदनवन, कपिलनगरात कर्फ्यु रद्द
त्यातील दोन पोलिस ठाण्यातील कर्फ्यु उठविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये परिमंडळ चारमधील नंदनवन आणि परिमंडळ पाचमधील कपिलनगर ठाण्याचा समावेश आहे. याशिवाय वाठोडा, हुडकेश्वर, सक्करदरा, इमामवाडा, जरीपटका, पाचपावली, यशोधरानगर या ठाण्यात सायंकाळी चार ते सहा या दरम्यान दोन तासाची शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.