Custard Apple
Custard Apple

सीताफळाच्या गोडव्याची पडली भुरळ

साधारणपणे विजयादशमी संपताच सीताफळांची सुरू होते बाजारात आवक

शितलवाडी : सर्वसामान्यांचा गावरान मेवा म्हणून ओळख असलेल्या सीताफळांची बाजारात आवक होण्यास प्रारंभ झाला. रामटेक बस स्टॅन्ड व बाजारात ठिकठिकाणी सीताफळांची दुकाने लागल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे विजयादशमी संपताच सीताफळांची बाजारात आवक सुरू होते. सध्या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्रेते बसलेले दिसून येतात. परंतु, दर आवाक्यात नसल्याने सामान्य ग्राहकांना त्यांचा आस्वाद घेणे कठीण झाले आहे.

सीताफळाचे दर महाग असले तरी हंगामी व पौष्टिक फळ म्हणून आवडीने जाते. त्यामुळे ग्राहकांनी सीताफळांना विशेष मागणी असल्याची फळ विक्रेत्याचे म्हणणे आहे. दसऱ्याच्या दरम्यान सीताफळ बाजारात येतात. परंतु यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे गरिबांना ग्रामीण सुकामेवा म्हणून ओळख असलेल्या सीताफळांची आवक गेल्या पंधरवड्यापूर्वीच बाजारात सुरू झाली आहे.

कमी खर्चात अधिक उत्पादन

कमी खर्चात पुरेसे उत्पादन देणारे फळ म्हणून सीताफळ ओळखले जाते. सीताफळाचा हंगाम जून ते जानेवारी दरम्यान तीन बहरत असतो. जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, अंतिम बहार हा जानेवारी आणि फेब्रुवारीचा असतो. जून ते ऑक्टोबरच बहर बाजारात आला आहे. सीताफळ लागवड ही शेतकऱ्यासाठी फायद्याची ठरते. सीताफळाला औषधे फवारणी आणि खतांसाठी फारसा खर्च नसतो. यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते. या माध्यमातून हंगामी रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे.

बहुगुणी सीताफळ

या फळात भरपूर कॅल्शिअम, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन असतात. सीताफळ खाण्यासाठी जितके चविष्ट आहे. तितकेच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पित्त शामक, तषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक. वातदोष कमी करणारे व ह्रदयासाठी सीताफळ फायदेशीर आहे. ह्रदयरोग व मधुमेह या आजारात उपयुक्त आहे. रक्तवाढी सोबत पित्त आणि ॲसिडीटीचा त्रास कमी करणारे ऊर्जेचा स्रोत असणारे हे फळ आहे. सीताफळाच्या बियांचा केशवर्धक औषधी बनविण्यासाठी अथवा भुकटी करून रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी वापर केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com