esakal | सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट पसरवणाऱ्यांनो सावधान; आता सायबर सेलची तुमच्यावर असणार करडी नजर
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट पसरवणाऱ्यांनो सावधान; आता सायबर सेलची तुमच्यावर असणार करडी नजर

सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट पसरवणाऱ्यांनो सावधान; आता सायबर सेलची तुमच्यावर असणार करडी नजर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः समाज माध्यमांवर (Social Media) चुकीच्या पोस्ट (Fake post) पसरविणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे (District Collector) यांनी दिला. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कथित सूचनांचा संदर्भ घेऊन जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या नावाने एक चुकीचा संदेश व्हॉटसअप ग्रुप व अन्य समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. अशा प्रकारचे कोणतेही वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेले नाही, अशा चुकीच्या, गैरसमज व भीती पसरवणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. (Cyber cell will take strict action against fake post creators on social media).

हेही वाचा: नागपूरकरांनो, बाधितांची संख्या घटतेय; ७२ तासांत तब्बल २१ हजार २४५ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्हाधिकारी यांच्या संदर्भ देऊन 'जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना ' या मथळयाखाली काही सूचनांचा संदेश व्हॉटसअपवर टाकण्यात आला आहे.तो जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाखाली प्रसारित करण्यात येत आहे. अशा प्रकारचे कोणतेही वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेले नाही. राज्य शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या कोविड प्रोटोकॉल सूचनेशिवाय जिल्हा माहिती कार्यालयाकडून असे कोणतेही वृत्त प्रकाशित केले जात नाही. या वृत्ताचा जिल्हा माहिती कार्यालयाशी संबंध नाही,असा खुलासा नागपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केला आहे.

हेही वाचा: उपराजधानीत भडकले गॅंगवॉर; भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी महिलेसह दोघांवर तलवारीने हल्ला

हे वृत्त कोणी प्रसारित केले याबाबत सायबर सेलकडे तपासणीसाठी देण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमण काळात लोकांमध्ये भिती व गैरसमज पसरवणाऱ्या अन्य पोस्टवरही नजर ठेवण्याची सूचना सायबर सेलला केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image