esakal | सावधान! नामांकित कंपन्यांचे अनोळखी कॉल्स उचलताना १० वेळा करा विचार; अन्यथा...
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! नामांकित कंपन्यांचे अनोळखी कॉल्स उचलताना १० वेळा करा विचार; अन्यथा...

सावधान! नामांकित कंपन्यांचे अनोळखी कॉल्स उचलताना १० वेळा करा विचार; अन्यथा...

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : गेल्या काही दिवसांत हायटेक सायबर गुन्हेगारांच्या (Cyber Criminals) टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या नामांकित कंपनीच्या नावाने नागरिकांना फोन करून ग्राहकांच्या बॅंक खात्यातून परस्पर पैसे काढण्याचा धडाका लावला आहे. आज सोमवारी असाच प्रकार उघडकीस आला असून दोघांना चार लाख रुपयांनी गंडा घातला आहे. नागपूर सायबर क्राईमचे (Nagpur Police Cyber Crime Department) अधिकाऱ्यांनी अनेक सायबर गुन्ह्यांचा छडा लावला आहे. परंतु आता नव्याने तयार झालेल्या हायटेक गुन्हेगारांचे आव्हान नागपूर पोलिसांना आहे. (Cyber criminals gangs are active in Nagpur)

हेही वाचा: 'त्यांनी' डॉक्टरांमध्ये प्रत्यक्ष बघितला देव! ऑक्सिजन लेव्हल ३० असतानाही वाचवला जीव

बीएसएनएल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून एका इसमाच्या मोबाईलमधून सर्व माहिती काढून परस्पर २ लाख ६० हजार रुपये वळते केल्याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ८ मे रोजी दुपारी १ ते २.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. जनता चौकातील दिवान प्लाझा येथे राहणारे नविंदरसिंग दिवानसिंग खुराणा (६६) हे आपल्या घरी हजर होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर अज्ञात आरोपीने फोन करून बीएसएनएल कंपनीचा कर्मचारी बोलत असल्याचे बोलत असल्याचे सांगितले.

त्यानंतर खुराणा यांच्या मोबाईलमधून माहिती चोरून आरोपीने खुराणा यांच्या फेडरल बँकेच्या खात्यातून परस्पर २ लाख ६० हजार रुपये परस्पर वळते केले. खुराणा यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

वीमा कंपनीच्या तोतयाने फसविले

वीमा पॉलिसीवर दहा टक्के कमीशन देणार असल्याचे सांगून १ लाख ३३ हजार ३२४ रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी मेडिकल चौकातील कॅपीटल हाईट्स येथे राहणाऱ्या दिलीप तुळशीराम देवतारे (६१) यांना एका अज्ञात आरोपीने फोन केला. मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून विम्याची वार्षिक प्रिमीयम भरल्यास दहा टक्के कमीशन मिळेल असे सांगितले.

हेही वाचा: धक्कादायक! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरवलेली लहान मुलं परस्पर दत्तक

त्यानुसार देवतारे यांनी आरोपीने दिलेल्या अ‍ॅक्सीस बँकेच्या खात्यात मॅक्स कंपनीच्या नावाने १ लाख ३३ हजार ३२४ रुपये भरले. परंतु, देवतारे यांना पावती न मिळाल्याने त्यांनी कंपनीच्या मुख्यालयात चौकशी केली असता आम्ही कुठलेही कमीशन देत नाही असे सांगितले. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच देवतारे यांनी इमामवाडा पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

(Cyber criminals gangs are active in Nagpur)

loading image
go to top