Nagpur Crime : ‘मी गुन्हेशाखेतून बोलतो, तुमच्या मुलाला अटक केली आहे’, ड्रायव्हरची ९ हजार रुपयाने सायबर फसवणूक
Online Scams and Phishing Attacks : नागपुरात सायबर चोरट्यांनी भीती आणि तांत्रिक फसवणुकीचा वापर करून एका चालकाची ९ हजार तर एका डॉक्टरची सुमारे ७० हजार रुपयांची लूट केली. बनावट पोलीस कॉल आणि खोट्या ट्रॅफिक चालान लिंकद्वारे ही फसवणूक झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
नागपूर : ‘मी गुन्हेशाखेतून बोलतो, तुमच्या मुलाला अटक केली आहे...’ अशी भीती दाखवीत ड्रायव्हरची सायबर चोरट्याने ९ हजार रुपयानी फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.