Ashadhi Wari 2025 : पंढरपूर सायकलवारीत रामटेकचे सहा सायकलवीर; निसर्ग व पर्यावरणाचा देणार संदेश, उद्या रवाना
Cycling journey from Nagpur to Pandharpur : नागपूर ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन टायगर ग्रुप ऑफ अडव्हेंचर आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त करण्यात आले आहे.
रामटेक : टायगर ग्रुप ऑफ अडव्हेंचर नागपूर आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त नागपूर ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. ही वारी नागपूरहून १५ जून रोजी पंढरपूरसाठी रवाना होईल.