
नागपूर : गोविंदा आला रे...हाथी घोडा पालखी...जय कन्हैया लालकी’ या घोषणा आणि जल्लोषात बेधुंद तरुणाई डीजेच्या तालावर दहीहांडीच्या उत्सवात थिरकली. हे चित्र होते. शहरातील आकर्षण ठरणाऱ्या इतवारीतील स्व. श्रीकांत असमरकर स्मृती प्रीत्यर्थ दहीहंडी उत्सवाचे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शनिवारी सराफा बाजारातील माधवराव मुकाजी खुळे चौकात आयोजन करण्यात आले होते.