farmer endlife
Sakal
नागपूर - मातीशी नाळ जोडून असलेल्या शेतकऱ्यांच्या शिवारात उगवणाऱ्या पिकांपेक्षाही अधिक वेगाने त्याच्या आत्महत्येचा आलेख वाढतो आहे. गत २५ वर्षांत ६,३८१ शेतकऱ्यांनी जीवन संपवीत तेवढ्याच कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या नोंदी शासनदरबारी घेण्यात आल्या आहे. प्रत्येक आकड्यामागे एक हरवलेला आधार, कोलमडलेले घर आणि अनुत्तरित प्रश्न आजही उभे आहेत.