Nagpur News : दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत बारा हजार वाहनांची विक्री

दसरा आणि दिवाळीचे मुहूर्त साधून ग्राहकांनी वाहनांची बंपर खरेदी केली. यंदा दसरा ते दिवाळी या २० दिवसांत शहरात १२ हजारांपेक्षा अधिक वाहनांची विक्री झाली.
new Two Wheelers
new Two Wheelerssakal

नागपूर - दसरा आणि दिवाळीचे मुहूर्त साधून ग्राहकांनी वाहनांची बंपर खरेदी केली. यंदा दसरा ते दिवाळी या २० दिवसांत शहरात १२ हजारांपेक्षा अधिक वाहनांची विक्री झाली. गतवर्षीपेक्षाच्या यंदा अधिक वाहनांची विक्री झाली. आतापर्यंत एकूण २,४३७ वाहनांची अधिक विक्री झाली.

दसरा व दिवाळीपर्यंत बाजारपेठेत ग्राहकांचा उत्साह कायम होता. या काळात १२ हजारांपेक्षा अधिक वाहनांची नोंदणी झालेली आहे. नोव्हेंबर महिन्यात ७०९२ पेक्षा अधिक वाहनांच्या नोंदणी झाली. आकडेवारीनुसार, आरटीओ-पूर्व (एमएच-४९) सर्वाधिक हीट राहिला. नोव्हेंबर महिन्यात आरटीओत ३०७२ वाहनांच्या नोंदणी आहेत.

तर ग्रामीण (एमएच- ४०) मध्ये ४४४९ आणि शहर (एमएच-३१) मध्ये १३८१ वाहनांच्या नोंदणी आहेत. तर २४ सप्टेंबर ते आतापर्यंत एमएच-४९ मध्ये ५१९६, एमएच-४० मध्ये ४२८२ आणि एमएच-३१ मध्ये २३२० वाहनांची नोंदणी झालेली आहे.

पेट्रोल वाहनांना पसंती

डिझेलचे दर आणि पेट्रोलचे दर समसमान पातळीवर आले आहेत. तसेच डिझेलच्या वाहनांमुळे प्रदूषण वाढत असल्याने ग्राहकांचा खरेदीचा कल कमी झालेला आहे. त्यामुळेच सर्वाधिक पेट्रोल इंधन असलेल्या वाहनांची नोंदणी होत आहे.

हायब्रीड वाहनांची विक्री वाढली

आरटीओच्या तिन्ही कार्यालयांमध्ये हायब्रीड वाहनांच्या नोंदणीची संख्याही वाढलेली आहे. पेट्रोल सोबतच सीएनजी, पेट्रोलसोबत इथेनॉल, पेट्रोलसोबत इलेक्ट्रिक वाहनांचे कॉम्बिनेशन आता पसंत पडत आहेत. तरीही ग्राहकांची संख्या कमी आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची चलती

इलेक्ट्रिक वाहनांनी हळूहळू जोर पकडला आहे. नोव्हेंबर महिन्यात एमएच-४९ मध्ये ६८८ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी करण्यात आली. तर डिझेल वाहनांची संख्या १८९ एवढी होती. आरटीओत २०७४ पेट्रोल वाहनांच्या नोंदणी झालेल्या आहेत. त्याप्रमाणे एमएच-३१ मध्ये २१५ इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणी झाल्या.

तर डिझेल वाहनांची संख्या १२० होती. ९६१ पेट्रोल वाहनांच्या नोंदणी झाल्या. एमएच-४० मध्ये २१४ इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणी करण्यात आल्या. यात डिझेल वाहनांची संख्या ४४८ एवढी होती. आरटीओत १९०४ पेट्रोल वाहनांच्या नोंदणीची माहिती आहे.

२४ सप्टेंबर ते आतापर्यंत नोंदणी

एमएच-४९ एमएच-४० एमएच-३१ एकूण

-५१९६ ४४४९ २३२० ११,९४५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com