esakal | परिस्थिती गंभीर! शववाहिकाही पडताहेत कमी, आता आपली बसमधूनही मृतदेहांची वाहतूक
sakal

बोलून बातमी शोधा

dead body carrier not available in nagpur for corona patients

नागपूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अतिशय चिंताजनक बनली आहे, दर दिवसाला मृत्यूचा टक्का वाढत आहे. कोरोनाच्या बाधेने दगावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते.

परिस्थिती गंभीर! शववाहिकाही पडताहेत कमी, आता आपली बसमधूनही मृतदेहांची वाहतूक

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना मृतांचा आकडाही वाढत आहे. परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की मृतदेह वाहून नेण्यासाठी शववाहिकाही कमी पडत आहेत. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घाटावर पोहचविण्यासाठी महापालिकेने आपली बसचा उपयोग शववाहिका म्हणून सुरू केला आहे. 

नागपूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अतिशय चिंताजनक बनली आहे, दर दिवसाला मृत्यूचा टक्का वाढत आहे. कोरोनाच्या बाधेने दगावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते. मृत्यू कमी असल्याने सामाजिक उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या सामाजिक संस्थांच्या शववाहिकेतून कोरोनाबाधितांचे शव अंत्यसंस्कारासाठी घाटावर पोहोचवण्यात येत होते. मात्र, मृत्यू वाढल्यामुळे या शववाहिकांची अल्प संख्या लक्षात घेत महापालिकेने आता आपली बसला रुग्णवाहिका बनवले असून शहरात सुमारे ४ बसेसमध्ये एकाच वेळी चार ते पाच कोरोनाबाधित शव अंत्यसंस्कारासाठी घाटावर पोहोचवण्यात येत आहेत. 

हेही वाचा - नागरिकांनो, कोरोना फोबियाच्या विळख्यात अडकू नका; कोरोना हा सामान्य आजारासारखा आजार

शवाची उचल करण्यासाठी पाच जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. मेडिकल आणि मेयोतील शवागारातून आपली बसमधून सकाळी ११ वाजता घाटावर अंत्यसंस्कारासाठी शव पोहोचवण्यास सुरुवात होते. ते रात्री ८ वाजेपर्यत सुरू असते. महापालिकेच्या ९ शववाहिका आहेत. त्यात चार आपली बस असलेल्या शववाहिकांची भर पडली आहे. 

मेडिकलच्या शवागारात ७० शव - 
बुधवारी पंधरा ते वीस तासांमध्ये मेडिकलच्या शवागारात सुमारे ७० पेक्षा अधिक मृतदेह गोळा झाले. यातील ७५ टक्के कोरोनाबाधित होते. मेडिकलप्रमाणेच मेयोची स्थिती आहे. मेयोतील शवविच्छेदन कक्षात दर दिवसाला सुमारे ४० पेक्षा अधिक मृतदेह गोळा होतात. यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कोरोनाबाधित असल्याचे कळते. 

हेही वाचा - ऑनलाइन परीक्षेत खर्च कमी, पण विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्काची वसुली

अम्बुलन्सदेखील बनल्या शववाहिका -
कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात इतर आजारांचे रुग्ण अम्बुलन्सचालकांना मिळत नाही. यामुळे अखेर अम्बुलन्समधून रुग्ण नेण्याऐवजी आता मृतदेह पोहोचवण्यात येत आहेत. मेडिकल -मेयो परिसरातील सर्वच रुग्ण पोहोचवणारे अम्बुलन्सचालक आता शववाहिकाचालक बनले आहेत. 

  • आपली बस असलेल्या शववाहिका -४ 
  • महापालिकेच्या शववाहिका -९ 
  • सामाजिक संस्थांच्या शववाहिका -१० 
     
loading image
go to top