esakal | चुलत जावांचा शॉक लागून मृत्यू; भेटीसाठी गेली अन् गमावला जीव | shock
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

चुलत जावांचा शॉक लागून मृत्यू; भेटीसाठी गेली अन् गमावला जीव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळमेश्वर (जि. नागपूर) : येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये मंगळवारी (ता. ५) दुपारी दोन चुलत जावांचा शॉक लागून मृत्यू झाला. अलका निरंजन विरुळकर (वय ४२ वर्ष) व मंजू पुरुषोत्तम विरुळकर (वय ४८ वर्षे) अशी मृत महिलांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, लहान जाऊ अलका ही कळमेश्वरातील वॉर्ड क्रमांक सातमध्ये राहते. तर मोठी जाऊ मंजू ही दत्त मंदिर रोड येथे भाड्याने राहते. मोठी जाऊ मंजू ही मंगळवारी दुपारी कळमेश्वर येथील बाजारात खरेदी करण्यासाठी आली होती. खरेदी झाल्यानंतर जवळच राहत असलेली छोटी जाऊ अलकाच्या घरी गेली होती.

यावेळी मंजूला अलका बाथरूमकडून येऊन बाथरूम मार्गावर तळपळत दिसली. अलकाला शॉक लागला होता. मात्र, याची माहिती मंजूला नव्हती. त्यामुळे मंजूने अलकाला काय झाले म्हणून स्पर्श केला. स्पर्श करताच मोठी जाऊ सुद्धा तेथेच कोसळली. बाथरूम परिसरात पाणी साचले असल्याने व जिवंत विद्युत तारेचा प्रवाह सुरू असल्याने दोघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हेही वाचा: सारेच झाले सुन्न; आजोबा, तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार

अलकाच्या पतीचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. अलकाला दोन मुले आहेत. तर मंजूला दोन मुले आहेत. दोघींची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. एकाच घरी दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना कळमेश्वरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ वक्त केली जात आहे.

loading image
go to top