पतीने वाचविला दोघींचा जीव अन् पत्नी गेली वाहून, मग...

पतीने वाचविला दोघींचा जीव अन् पत्नी गेली वाहून, मग...

मेंढला (जि. नागपूर) : गुरुवारी (ता. २३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या महिला घरी परत येत असताना नरखेड तालुक्यातील रामठी येथील शिंपी नाल्याला पूर आल्याने महिला वाहून गेली. त्यानंतर अगदी नजीकच तिचा मृतदेह आढळून आला.

गुरुवारी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस आल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशात सकाळी वातावरण साफ असल्यामुळे व पाऊस येत नसल्याचा अंदाज करीत शेतकरी वामन सवई (रा. रामठी) शेतात भुईमूग काढण्यासाठी पत्नीसह, दोन शेत मजूर महिला घेऊन शेतामध्ये गेले. परंतु, नियतीच्या मनात काय होते कुणास ठाऊक.

पतीने वाचविला दोघींचा जीव अन् पत्नी गेली वाहून, मग...
रात्रीच्या अंधारात बोकड चोरला, कापला अन् मालकालाच विकला

दुपारी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबणार नाही, असे लक्षात येताच वामन सवई व पत्नी वंदना (वय ४०) आणि दोन शेतमजूर महिला बैलबंडीमध्ये बसून घराकडे यायला निघाले. शिंपी नाल्याला पूर आल्याने पुरात बैलबंडीसह सगळेच वाहून गेले असता वामन सवई यांना पोहता येत असल्याने दोन शेतमजूर महिलेचे जीव वाचविण्यात त्यांना यश आले. परंतु, स्वतःच्या पत्नीचा पाण्याच्या प्रवाहात हात सुटल्याने तिला वाचविण्यात अपयश आले.

यावेळी घटनास्थळापासून काही अंतरावर तिचा मृतदेह मिळाला. या घटनेची माहिती जलालखेडा पोलिस ठाण्यात देण्यात आली. जलालखेडाचे ठाणेदार हरीशचंद गावडे यांच्यासह मेंढला बीट जमादार पुरुषोत्तम धोंडे, शरद घोरमाडे, तलाठी वाहाणे, दिवाकर गांजरे, पोलिस पाटील रामठी, प्रफुल्ल मुसळे आदी उपस्थित होते.

पतीने वाचविला दोघींचा जीव अन् पत्नी गेली वाहून, मग...
महादेव, श्रीराम व सीतेच्या चरणांनी पावन झालेले मन्नाथेश्वर देवस्थान

महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला व उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथे पाठविण्यात आला. घटनेचा पुढील तपास जलालखेडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार हरीशचंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार पुरुषोत्तम धोंडे, शरद घोरमाडे करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com