esakal | श्रीगणेश मूर्तीची उंची ठरवली, रुंदी नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

pune

श्रीगणेश मूर्तीची उंची ठरवली, रुंदी नाही!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जितके नियम केले जातात त्यापेक्षा अधिक वेगाने पळवाटा शोधल्या जातात. कोरोनामुळे राज्य सरकारने सार्वजनिक मंडळाच्या उत्सवावर लगाम घालण्यासाठी गणेश मूर्तींच्या उंचीवर बंधन टाकले आहे. मात्र बुद्धीची देवता असलेल्या गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पासाठी युक्ती योजली. २० फुटांची आडवी मूर्ती बसवून उंचीचा नियम मात्र, पाळला.

गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांमध्ये सर्वाधिक उंच मूर्ती कोणाची याची आपसांत स्पर्धा लागली असते. नवनव्या युक्त्या व कल्पकता वापरून आकर्षक देखावे केले जातात. त्याला रोशणाईचा झगमगाट दिला जातो. कोणी भांड्यांची तर कोणी नारळाची मूर्ती तयार करतो. माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या एकता मंडळामार्फत दरवर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. मॉडेलमीलचा गणपती अशी ओळख असलेल्या कॉटन मार्केट चौकातही दरवर्षी आगळीवेगळी मूर्ती स्थापन केली जाते.

सार्वजनिक मंडळांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ४ फूट उंचीपेक्षा उंच गणेशाची मूर्ती मंडळांना बसविता येणार नाही. मात्र या नियमांमध्ये लांबीची उल्लेख नाही. नियमातील हीच पळवाट शोधून एकता गणेश उत्सव मंडळाने तब्बल २० फुटांची गणेशाची आडवी मूर्ती बसवली आहे. त्यामुळे मंडळावर कारवाई कशी व कुठल्या नियमाने करावी, असा प्रश्न निर्माण होणार आहे.

loading image
go to top