
नागपूर : एक काळ होता, जेव्हा गावागावात व मोहल्या-मोहल्यात कुस्तीचे आखाडे व व्यायामशाळा दिसायच्या. वर्षभर नियमित कुस्तीच्या स्पर्धा, फड व दंगली व्हायच्या. या देशी खेळांचा सर्वत्र माहोल असायचा. मात्र काळाच्या ओघात कुस्तीलाही घरघर लागली आहे. राजकारण, पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत भांडणे व राजाश्रयाच्या अभावी विदर्भ व महाराष्ट्राची ओळख असलेली कुस्तीच आता चीत झाली आहे. राज्य शासनाकडून अपेक्षित प्रोत्साहन मिळत नसल्यामुळे तरुणाई या खेळापासून दूर पळत असल्याचे निराशाजनक चित्र सध्या जागोजागी दिसून येत आहे.