
नागपूर : विश्वविद्यालयात पायाभूत सुविधा, चांगली इमारत आणि उत्तम वातावरणासाठी सरकार निधी देते. परंतु शैक्षणिक उत्कृष्टतेचा प्रश्न येतो तेव्हा तो पूर्णपणे कुलगुरू आणि प्राध्यापकांच्या हातात असतो. त्यामुळे विद्यापीठाला उत्कृष्ट बनवण्यासाठी कुलगुरू, प्राध्यापकांचे समर्पण आणि योगदान आवश्यक आहे, असे मत सरन्यायाधीश आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरचे कुलपती भूषण गवई यांनी व्यक्त केले.