Education Rights : बार्टीच्या जेईई व नीट पूर्व प्रशिक्षणाला विलंब होत असल्यामुळे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात आहे. निविदा प्रक्रियेत वेळ जात असल्याने १२०० हून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती पालकांमध्ये आहे.
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील अनुसूचित जातीतील उमेदवारांना जेईई, नीट परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण दिले जाते. यावेळी मात्र १० वीचा निकाल लागून वीस - पंचवीस दिवस उलटून गेले.