

नागपूर - दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती होणार होती. त्याची प्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र, संचमान्यतेनुसार नियमित शिक्षकांची भरती होणार आहे. त्यानंतर कंत्राटींचा विचार केला जाणार असल्यामुळे नियुक्तीची आस लावून बसलेल्या उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.