Video : नागपुरातील कोरोना वाढीमागे दिल्लीचा हात : नितीन राऊत | Corona | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitin raut

Video : नागपुरातील कोरोना वाढीमागे दिल्लीचा हात : नितीन राऊत

नागपूर : राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढणारी कोरोना बाधितांची संख्या चिंतेचे कारण बनली आहे. त्यात नागपूरमधील वाढणाऱ्या कोरोना बाधितांमागे दिल्लीतील प्रवासी आहेत, असे विधान राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केले आहे. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. (NItin Raut On Nagpur Corona Cases)

राऊत म्हणाले की, नागपुरातील वाढत्या कोरोनाच्या घटनांमागील मुख्य कारण म्हणजे दिल्लीतून येणारे प्रवासी असून, आज आढळलेल्या 35 केसेसपैकी सर्वाधिक रूग्ण हे दिल्लीतील आहेत. त्यामुळे राज्य सरकारने दिल्लीतून येणाऱ्या प्रवाशांचे विमानतळावरच ट्रेसिंग आणि टेस्टिंग केल्यास भविष्यातीस संभव्य धोका टाळणे शक्य होईल. दरम्यान, शहरातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येनंतर शहरी आणि ग्रामीण भागातील चाचण्या वाढवण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे राऊत म्हणाले.

हेही वाचा: Norovirus: कोरोना, मंकीपॉक्सनंतर भारतात नवा विषाणू; वाचा लक्षणे

देशासह राज्यातील वाढती आकडेवारी चिंतेची

देशभरात गेल्या चोवीस तासात ४,२७० नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, यामध्ये एकट्या महाराष्ट्रातून १,३५७ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापू्र्वीदेखील महाराष्ट्रात कोरोनाचे १,१३४ नवीन रुग्ण आढळून आले होते आणि तिघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांनंतर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा (patient) आकडा ५,८८८ वर पोहोचला असून, राज्य सरकारने कोरोना नियंत्रणासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Delhi People Behind Corona Cases Raised In Nagpur Says Energy Minister Nitin Raut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top