
नागपूर : शहरात व्हायरल फिवरच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असताना डेंगीनेही डोके वर काढले आहे. शहरात बुधवारी महानगरपालिकेच्या पथकांनी ८४८४ घरांची तपासणी केली. ताप असलेल्या नागरिकांची तपासणी केली असता ९३ जणांना डेंगी झाल्याचे आढळले आहे.
डेंगी प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू आहे. डेंगी प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. बुधवारी (ता.१५) झोननिहाय पथकाद्वारे सर्वेक्षण करण्यात आलेल्या घरांपैकी ३०३ घरे ही दूषित आढळली. या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली.
याशिवाय ९३ ताप असलेले रुग्ण आढळून आले. १२७ जणांच्या रक्ताचे नमुने तर ५ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान ४६७ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात ४४ कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. मनपाच्या चमूद्वारे ८० कूलर्स रिकामे करण्यात आले. १८० कूलर्समध्ये १ टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर १८६ कुलर्समध्ये २ टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आले. तसेच २१ कूलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.
डेंगी प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरामध्ये किंवा परिसरात कुठेही डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. डेंगीसंबंधी कुठलीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.