Devendra Fadanvis: स्वत: स्टेअरिंग हातात घेत समृद्धी महामार्गाची फडणवीस यांनी घेतली दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis: स्वत: स्टेअरिंग हातात घेत समृद्धी महामार्गाची फडणवीस यांनी घेतली दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी करत आहेत. समृद्धी महामार्गाचे 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर ते शिर्डी असा सोबत प्रवास करून समृद्धी महामार्गाची ट्रायल घेत आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत पाहणी करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीतून प्रवास करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्टेअरिंग सांभाळली आहे. दरम्यान राजकीय वर्तुळात चर्चा चालते की, मुख्यमंत्री जारी एकनाथ शिंदे असतील तरी सर्व निर्णय मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. अशातच आता समृद्धी महामार्गावरील टेस्ट ड्राईव्ह दरम्यान गाडीची स्टेअरिंग देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. यामुळे पुन्हा या चर्चा सुरू होऊ शकतात.

हेही वाचा: Karnatak Posters : कर्नाटक नव्याने पाहुया; CM शिंदे नागपुरात दाखल होण्यापूर्वी पोस्टरबाजी

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण येत्या 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, त्यापूर्वी , ४ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर ते शिर्डी असा सोबत प्रवास करून समृद्धी महामार्गाची ट्रायल घेत आहेत.