नागपूर : देशीपेक्षा विदेशीला पसंती; तीन कोटी ८६ लाख लीटर दारू रिचवली

वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत वर्ष २०२१-२२ मध्ये मद्य विक्रीत वाढ
Desi daru alcoholic 3 crore 86 lakh liters of liquor Nagpur
Desi daru alcoholic 3 crore 86 lakh liters of liquor Nagpuresakal

नागपूर : कोरोनामुळे रोजगारावर परिणाम झाला. तर आता महागाईमुळे सर्व सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. नागरिकांना काटकसर करावी लागत आहे. अनेकांना मुलाबाळांच्या मागण्याही पूर्ण करता येत नाही. परंतु मद्यप्रेमीवर याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत वर्ष २०२१-२२ मध्ये मद्य विक्रीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे देशी दारूची विक्री मागील वर्षीच्या तुलनेत कमी असून विदेशी दारूची विक्री वाढली आहे. मद्यप्रेमीचा कल देशीपेक्षा विदेशकडे जास्त असल्याचे दिसून येते. वर्ष २०२१-२२ मध्ये तीन कोटी ८६ लाख लिटर दारू पिणाऱ्यांनी रिचवली.

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाउन लावण्यात आले होते. त्यावेळी दारू विक्रीचे दुकाने बंद होती. परंतु नंतर दारू विक्री ऑनलाइन करण्यात आली. या काळात दारू विक्रीवर काही प्रमाणात परिणाम झाला होता. परंतु त्यानंतर व्यवसाय पूर्व पदावर आला. इतर व्यवसायाच्या तुलनेत हा व्यवसाय लवकर पूर्वपदावर आल्याचे सांगण्यात येते. कोरोनामुळे अनेकांच्या रोजगारासोबत उत्पन्नावर परिणाम झाला. परंतु दारू पिणाऱ्यांच्या संख्येत त्या तुलनेत कमी परिणाम झाला. पिणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढल्याचा दावा करण्यात येते. वर्ष २०२०-२१ मध्ये देशी दारूची विक्री ही २ कोटी ६२ लाखाच्या घरात होती. तर वर्ष २०२१-२२ मध्ये त्यात जवळपास १३ लाख लिटरने घट झाली. यावर्षात २ कोटी ४९ लाख लिटर दारू पिणाऱ्यांनी रिचवली. तर १ कोटी ३६ लाख लिटर विदेश दारू पिली. मागील वर्षीच्या तुलनेत विदेशी दारूच्या विक्रीत वाढ झाली. ही वाढी १३ लाख ८६ हजार लिटरच्या घरात आहे.

वर्ष २०२०-२१ २०२१-२२

देशी २,६२,३२,८३१ २,४९,०५,८२२

विदेशी १,२२,८६,४०८ १,३६,७३,३३७

बिअर ७२,२८,४६३ ६१७१४७३

वाईन १,६५,११७ २२१६२२

३ कोटी ३४ लाखांचा माल जप्त

उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात ३ कोटी ३४ ला १८ हजार १२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर ३०३२ प्रकरणात गुन्हे दाखल करून २५५७ आरोपींना ताब्यात घेतले. १६६ वाहन जप्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com