Nagpur Liquor Consumption: पूर्व विदर्भात देशीचा ‘महापूर’! नागपूर विभाग विक्रीत अव्वल; विदेशी मद्याच्या दरवाढीचा परिणाम
Revenue Growth: महाराष्ट्रात देशी दारूच्या विक्रीत तब्बल ७.५७ टक्क्यांची वाढ झाली असून नागपूर विभाग अव्वल ठरला आहे. विदेशी दारू महाग झाल्याने अनेक मद्यप्रेमी देशीकडे वळल्याने महसुलातही मोठी वाढ झाली आहे.
मुंबई : पूर्व विदर्भात विशेषत: नागपुरात देशी दारू अक्षरशः ओसंडून वाहत आहे. राज्यभरात गेल्या सहा महिन्यांत देशी दारूचा खप आठ टक्क्यांनी वाढला असून, यामध्ये नागपूर विभाग अव्वल ठरला आहे.