हारी बाजी को जितना हमे आता है! कोरोनाशी लढताना अशी वाढवा ‘इम्युनिटी’

corona mask
corona mask

नागपूर : सध्या कोरोना विषाणूचा सर्वत्र कहर सुरू आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच ‘इम्युनिटी’ बळकट करणे आवश्यक आहे. इम्युनिटी कमजोर असणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे. इम्युनिटी आपल्या शरीरातील टॉक्सिन्सशी लढण्यास मदत करते. चांगली इम्युनिटी, केवळ सर्दी, खोकल्यापासूनच वाचवत नाही, तर काविळ, यकृताचा संसर्ग, किडनीचा संसर्ग अशा अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असण्याची अनेक कारणे आहेत. आधीपासूनच असलेला एखादा आजार, व्यसनाची सवय, झोप पूर्ण न घेणे, खाण्या-पिण्याच्या सवयी रोगप्रतिकार शक्ती कमजोर करण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे.

  • आतड्यांमधील बॅक्टेरिया थेट इम्युन सिस्टमवर विपरित परिणाम करतात. सतत अतिसार, अल्सर, गॅसेसचा त्रास, सूज येणे, अतिसार किंवा बद्धकोष्ठता असेल तर रोगप्रतिकार शक्ती योग्यरित्या काम करीत नाही असे समजावे. यावर डॉक्टरांचा सल्ला त्वरीत घ्यावा.
  • झोप पूर्ण होऊनही थकवा जाणवत असल्यास हे इम्युनिटी कमजोर असल्याचं लक्षण असू शकतं.
  • शरीरावर जखम झाली असेल ती जखम लवकर बरी होत नसेल तर रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, असे म्हणता येईल. डॉक्टरांशी संपर्क साधून यावर सहज उपाय करता येतात.

अशी वाढवा इम्युनिटी
कोरोना काळात आठ तासांची झोप घ्यावी. तणावापासून दूर राहावे. रक्तक्षय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.व्हिटॅमिन डी इम्युनिटी वाढवण्याचे काम करते. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास ती भरुन काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या काळात सर्वांनी व्हिटॅमिन सी, झिंक, घ्यावे. प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
डॉ. तिलोत्तमा रमेश पराते, सहयोगी प्राध्यापक, मेयो रुग्णालय, नागपूर.


संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com