esakal | Video : दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला की पेढे वाटणे अशी शिवसेनेची परिस्थिती; देवेंद्र फडणवीसांची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra fadanvis criticize Shivsena

महाविकास आघाडीतील सर्वछ पक्ष सोबत निवडणूक लढले तर भाजपसाठी हे चांगलंच आहे यामुळे भाजपला अधिक जागा लढत येणार आहे. त्यामुळे भाजपची ताकत वाढेल असंही फडणवीस यांनी म्हंटलंय. 

Video : दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला की पेढे वाटणे अशी शिवसेनेची परिस्थिती; देवेंद्र फडणवीसांची टीका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर: गेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये कोण बाजीमारणार याकडे संपूर्ण राज्याच्या जनतेचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी मिळून यावेळी निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता यापुढील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील तीनही पक्ष सोबत लढणार हे स्पष्ट झालं आहे.  त्यामुळे दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला की पेढे वाटणे अशी शिवसेनेची परिस्थिती आहे असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. 

अधिक माहितीसाठी - राणे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : कुत्र्याचे इंजेक्शन देऊन पत्नीने केला पती, मुलांचा खून

महाविकास आघाडीतील सर्वछ पक्ष सोबत निवडणूक लढले तर भाजपसाठी हे चांगलंच आहे यामुळे भाजपला अधिक जागा लढत येणार आहे. त्यामुळे भाजपची ताकत वाढेल असंही फडणवीस यांनी म्हंटलंय. 

पुढे निवडणूक लढवताना महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपावरून गोंधळ होणार आहे. तीनही पक्षांना जास्त जागा मिळणार नाहीत. मात्र हजपला मोठी स्पेस मिळणार आहे असंही फडणवीस म्हणाले. 

जाणून घ्या - मैत्रिणीवर शेरेबाजी केल्याने काढली पिस्तूल; क्षणभरात ढाबा रिकामा झाल्यानंतर सत्य आले समोर

शिवसेनेला टोला 

विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला एक जागा मिळाली  मात्र शिवसेनेला एकही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला की ते पेढे वाटणे अशी परिस्थिती शिवसेनेची आहे. शिवसेनेला या निवडणुकांमध्ये काहीही लाभ झाला नाही. संजय राऊत मात्र बोलत असतात अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image