
नागपूर : तो दिवस होता १ डिसेंबर २०१९. दुपारचे २ वाजून ५४ मिनिटे झाली होती. स्थळ होते महाराष्ट्राची विधानसभा. भाजप-शिवसेना युतीला निवडणुकीमध्ये १६१ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही भाजपला विरोधात बसावे लागले होते. विशेष अधिवेशनात विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एक शेर सादर केला होता.