
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानावर नागपूरचे सुपूत्र देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजधानीत हा सोहळा सुरू असतानाच उपराजधानीत ठिकठिकाणी जल्लोष झाला. ढोलताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला व आतषबाजी करीत तिसऱ्या ‘देवेंद्र पर्वा’चे स्वागत केले.