Devendra Fadnavis : दक्षिण-पश्चिममध्ये देवाभाऊंचा दबदबा...नोटाला पाचव्या क्रमांकाची मते : आघाडीत दहा हजार मतांची घसरण
South West Constituency Result : दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांनी चौथ्यांदा विजय मिळवला, पण गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांची आघाडी १०,००० मतांनी कमी झाली आहे.
नागपूर : हायप्रोफाईल मतदार संघ असलेल्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी सलग चौथा आणि पूर्वीच्या पश्चिम मतदारसंघासह षटकार मारला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ३९ हजार ७१० मतांनी विजय मिळवला.