

Nagpur Muddy Road
esakal
कोदामेंढी : शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सुलभ मार्ग उपलब्ध व्हावा, या उद्देशाने तयार करण्यात आलेला देवमुंढरी येथील मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पांदण रस्ता अवघ्या दीड वर्षातच चिखलात रुतला आहे. मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनचालकांसह शेतकऱ्यांना पायी जाणेही कठीण आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.