Nagpur News: धामणगावात वनव्यामुळे आग; ४० घरे खाक; मनुष्यहानी टळली; जनावरे दगावली, शेकडो नागरिक बेघर

Massive Fire in Dhamangaon Destroys Over 40 Homes: धामणगावात लागलेल्या भीषण आगीत ४० हून अधिक घरे जळून खाक झाली. मनुष्यहानी टळली, मात्र अनेक जनावरे दगावली.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

भिवापूर: तालुक्यातील धामणगाव (विद्यामंदिर) येथे शनिवारी (ता.२) सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ४० पेक्षा अधिक घरे जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी अनेक जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत घरातील धान्य, कपडे, कागदपत्रे व जीवनावश्यक वस्तू पूर्णतः नष्ट झाल्याने गावातील अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com