Pandan Road : बैलगाडी शेतात नेणे झाले कठीण, शेतीकामे ठप्‍प; पांदण रस्ता तयार करण्याची मागणी

कुही तालुक्यातील साळवा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चापेगडी येथील शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली आहे.
Pandan Road
Pandan Roadsakal
Updated on

- उल्हास मेश्राम

साळवा : कुही तालुक्यातील साळवा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चापेगडी येथील शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली आहे. शेतात जायचे कसे, शेतापर्यंत शेतीचे साहित्य पोचवायचे कसे, शेतातील माल घरापर्यंत आणायचा कसा, असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहेत. मागील बऱ्याच वर्षांपासून आजी, माजी आमदार-खासदार, जि.प.सदस्य, ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

चापेगडी येथील पांदण रस्ता अमृत कुभंरकार ते सोमा जगण मुंडले यांच्या शेतापर्यंत दोन किलोमीटरचा हा पांदण रस्ता वारवांर तक्रार करुनही दयनीय अवस्थेत आहे. यावर्षीही शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

पावसाळा जाण्याच्या मार्गावर आहे. पावसाळा आटोपला की पांदण रस्त्याच्या प्रश्न दुर्लक्षित केला जाता. यावर्षी पिके उभी राहण्याआधी पावसाने शेतातील सर्व काही उद्धवस्त केले. आता गावातून शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याने नवी समस्या निर्माण केली आहे. गावाच्या विकासात रस्ते महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे म्हटले जाते.

गावातील पांदण रस्ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. मात्र आता पांदण रस्ते शेतकऱ्यांच्या पावसाच्या पाण्यामुळे चिखलाने बरबटले आहेत. शेतकऱ्यांना या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.

अशा परिस्थितीत शेतीच्या कामावर मोठा परिणाम होत आहे. राज्य सरकारने गावांना जोडणाऱ्या पांदण रस्त्यासाठी मातोश्री पांदण रस्ता योजना सुरू केली. मात्र ही योजना तालुक्यामधील काही गावांना जोडणाऱ्या पांदण रस्त्यापर्यंत पोहोचली नाही. पावसामुळे हे रस्ते पूर्णपणे चिखलाने माखले असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पांदण रस्ता तयार करण्याची मागणी

जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावांमध्ये या रस्त्यावर दोन ते तीन फूट चिखल साचलेला दिसून येतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना चिखलमय रस्त्यावरून मार्ग काढावा लागतो. यातून शासनाच्या योजनेतील रस्त्याचा विकास चिखलात गाडल्या गेल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे, मात्र ग्रामीण भागात पांदण नसल्याने शेतकऱ्यांची वाट अधिकच खडतर होत आहे. पांदण रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी मिताराम पराते, भगवान मुंडले, दुर्याधन लेंडे, सुर्यभान लेंडे, चैत्यराम लेंडे, लेंडे, यशवंत पराते, नत्थू तळेकार यांनी केली.

ग्रामीण विकास निधी जातो कुठे? शासनस्तरावर दरवर्षी विविध योजना राबविल्या जातात. मात्र या योजनांना पुरेसा लाभ शेतकऱ्यांना हवा तसा मिळत नाही. पीक लहान असो वा मोठे, शेतकरी त्यांची कापणी होईपर्यंत जीवाची पर्वा न करता रक्षण करतो.

पण त्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ताही नाही, ही खेदजनक बाब आहे. शेतकऱ्यांच्या दर्जा उंचा होण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाकडून लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो. परंतु शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे नीट पाडली जात नसल्याने दिलेली निधी जातो कुठे?

-मिताराम पराते, शेतकरी, चापेगडी

रोजगार हमी योजनेमार्फत पांदण रस्ता तीन ते चार वेळा मंजूर होवूनही रस्ता करण्याची तयारी नाही. काळानुसार यांत्रिकीकरणाने काम करण्याची नितांत गरज आहे. दहा वर्षापासून पाठपुरावा करुन राजकीय कारणांनी अपयश आले आहे. खरबी, चापेगडी, साळवा. सावरगाव या गावातील शेतकरी हा पांदण रस्ता झाल्यास शेतात येणा-जाण्याने सुखावतील. अंदाजे अंतर तीन किलोमिटर पांदण रस्ता आहे.

-नवनाथ लेंडे, माजी सदस्य, गटग्रामपंचायत चापेगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com