‘डिजिटल करन्सी’ फसवणुकीचा पर्दाफाश; चार जणांना लोणावळ्यातून अटक

पोलिस आयुक्तांची माहिती; मुख्य आरोपीसह चार जणांना लोणावळ्यातून अटक
Digital Currency fraud e
Digital Currency fraud esakal

नागपूर : ‘इथरॉन’ या डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करुन फसवणूक करील कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यामधील मुख्य आरोपीसह चार जणांना लोणावळा येथून अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज पोलिस जिमखान्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

निशिद महादेव वासनिक (आराधनानगर), प्रगती निशिद वासनिक, गजानन भोलेनाथ मुनगुने (रा. भिसी, चंद्रपूर), संदेश पंजाब लांजेवार (रा. गोडेगाव खदान, कन्हान) अशी आरोपींची नावे आहेत. २०१७ साली निशिद वासनिक याने शहरातील श्रीमंत व्यक्तींना डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करुन त्यातून मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचे आमिष दिले होते. त्यातून त्याने ‘इथर ट्रेड एशिया’ नावाने कंपनी तयार करुन त्यात जवळपास दोनशे व्यक्तींचे कोट्यवधी रुपये गुंतविले. मात्र, मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात तो पैशासह फरार झाला. त्यानंतर त्याच्याविरोधात यशोधरानगर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र, तो सातत्याने पोलिसांना हुलकावणी देत असल्याचा दिसून आला. दरम्यान काही दिवसांपूर्वी तो लोणावळा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी त्याला १७ तारखेला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. त्याच्यावर यापूर्वीही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. यावेळी त्याच्याकडून ५० तोळे सोने, चार आलिशान कार, एक पिस्तूल, जीवंत काडतूस असा दोन कोटींच्यावर मुद्देमाल जप्त केला असल्याचेही ते म्हणाले.

पचमढीतील पार्टीनंतर फरार

निशिद वासनिक याने गुंतवणूक करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारासाठी पचमढी येथे एका आलिशान हॉटेलमध्ये मोठी पार्टी दिली होती. त्यानंतर नागपूरला परत येताना त्याच्या मोबाईल स्वीच ऑफ झाला. तेव्हापासून त्याला संपर्क केला असता तो होत नसल्याने गुंतवणूकदारांनी त्याच्या घरी जाऊन पत्नीलाही विचारणा केली. मात्र, यावेळी तिनेही सर्वांचे पैसे परत मिळेल असे सांगितले. त्यानंतर तीही कुटुंबासह फरार झाली. विशेष म्हणजे, त्याच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेल्या एकाचीही नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे.

वाशीम खुनाचाही उलगडा

निशिद वासनिकच्या कंपनीत त्याचा असिस्टंट म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीचा वाशिममध्ये खून झाल्याची माहिती समोर आली होती. या असिस्टंटकडे त्याच्या खाते आणि मोबाईलचे पासवर्ड होते. त्यामुळे तो याचा फायदा घेत, सर्व पैसे वळवून घेईल अशी भीती निशिदला होती. त्यामुळेच निशिदन या असिस्टंटचा वाशिममध्ये खून केल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता निशिद पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणाचाही उलगडा होणार आहे.

मुलगा करायचा ऑनलाइन क्लासेस

निशिदचा मुलगा लाव्हा परिसरातील दिल्ली पब्लिक स्कुल येथे शिकायचा. निशिद फरार झाल्यावरही त्याचा मुलगा येथील शाळेत ऑनलाइन क्लासेस करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, त्यानंतरही तो नेमका कुठे लपून बसला आहे, याबाबत माहिती मिळाली नाही. यादरम्यान त्याच्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली, गुजरात आणि मुंबईलाही पोलिसांनी शोध घेतला. अखेर तो लोणावळ्याला असल्याची माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांना एक लाखाचे बक्षिस

निशिद वासनिक प्रकरणात पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा करीत त्याला गजाआड केले. या प्रकरणात त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी पोलिसांनी गुन्हेशाखेच्या पथकाला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com