

Dr Babasaheb Ambedkar Sports Academy Fraud: दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीद्वारे सचालित डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीचा आर्थिक व्यवहार कोटीच्या घरात आहे. परंतु स्मारक समितीच्या ऑडिटमध्ये अकादमीच्या आर्थिक व्यवहारांचा अंतर्भाव नाही.
प्रथमदर्शनी गैरव्यवहार असल्याचे दिसून येत असल्यामुळे अकादमीच्या आर्थिक व्यवहारासंबंधीचा हिशोब समितीसमोर सादर करण्याची मागणी स्मारक समितीने केली. परंतु अकादमीने अद्याप हिशोब न दिल्याने ही स्पोर्ट्स अकादमी बंद करण्याचा निर्णय स्मारक समितीने बहुमताने घेतल्याची माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीने पत्रकार परिषदेत समितीने दिली.
सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दीक्षाभूमीवरील स्पोर्ट्स अकादमीचे एक स्वतंत्र खाते आहे. त्याद्वारे आर्थिक व्यवहार होतात. यात समितीचे माजी सचिव आणि प्रा. अरविंद जोशी या दोघांच्याच स्वाक्षरीने हे खाते चालत होते. परंतु ही बाब समितीच्या सर्व सदस्यांपासून लपवून ठेवण्यात आली होती. सचिवपदावर नियुक्तीनंतर मला स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले, तेव्हा पहिल्यांदा ही बाब उघडकीस आली. (Latest Marathi News)
यासंदर्भात माहिती नसल्याने स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचे गवई यांनी सांगितले. मागील ११ वर्षांपासूनच्या या अकादमीच्या आर्थिक व्यवहारासंबंधीची माहिती मागवण्यात आली असून ही अकादमी बंद करण्याचा निर्णय समितीने बहुमताने घेतल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य भदंत नाग दीपांकर, एन.आर. सुटे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. प्रदीप आगलावे, विलास गजघाटे, डी. जी. दाभाडे उपस्थित होते.
दीक्षाभूमीवरील स्पोर्ट्स अकादमीचे एक स्वतंत्र खाते आहे. यासंदर्भात प्रा. अरविंद जोशी यांच्याशी संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही. (Latest Marathi News)
बुद्धमूर्तीबाबत निर्णय घेणार
दीक्षाभूमीवर अलोट गर्दी होत असल्याने येथील जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे थायलंड येथून मिळालेली बुद्धमूर्ती दीक्षाभूमीऐवजी इतर ठिकाणी बसविण्याचा निर्णय घेण्यात येईल. याबाबत स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरेई ससाई यांच्यासह सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. गवई म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.