खामगाव : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा (Dilipkumar Sananda) काँग्रेस सोडून पक्षांतर करणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सातत्याने होत होती. अखेर महूर्त ठरला असून सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या १३ जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत खामगाव येथे प्रवेश सोहळा होणार असून यावेळी दिलीपकुमार सानंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधणार आहेत.