
नागपूर : तीस-पस्तीस वर्षांपासून दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त अकराशे शेतकरी हक्कासाठी लढत आहोत. मात्र शासनाकडून आमच्या तोंडाला पानेच पुसली जात आहेत. यवतमाळ वर्धा चंद्रपूर या तीन जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्तांच्या वेदना ऐकून घेण्यासाठी शासनाला वेळ नाही, अशा भावना व्यक्त करती आता आम्ही ३० जून रोजी थेट मुख्यमंत्री यांच्या कार्यालयावरच न्याय मागण्यासाठी पुन्हा येणार आहेत, असा इशारा देत प्रकल्पग्रस्तांनी थेट सिंचन सेवा भवनात ठिय्या मांडताना दिला.