या कारणावरून सत्तापक्षात मतभेद.. वाचा काय आहे प्रकरण

file photo
file photo
Updated on

नागपूर : सर्वसाधारण सभेवरून जिल्हा परिषदेतील सत्तापक्षात मतभेद आहेत. पहिलीच सभा असल्याने अध्यक्ष रश्‍मी बर्वे यांना उपस्थित राहायचे आहे. घरातील व्यक्तीच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्या क्वारंटाइन आहेत. त्यांना उपस्थित राहणार येणार नसल्याने सभा पुढे ढकलण्याचा मानस त्यांचा आहे. परंतु उपाध्यक्ष मनोहर कुंभारसह इतर सभापती हे सभा घेण्याच्या पक्षात आहे. सभेच्या माध्यमातून सत्तापक्षातील शीत युद्ध चव्हाट्यावर येण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषदेची सभा गेल्या पाच महिन्यापासून झाली नाही. कोरोनामुळे अर्थसंकल्पीय सभा घेता आली नाही. यामुळे अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यावर बंधने आलीत. एकदा जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकरली. दुसऱ्यांना महानगर पालिकने भट सभागृह देण्यास नकार दिल्याने सभा लांबली.

आता वनामती येथे 24 जुलैला सभा घेण्याचे निश्‍चित झाले असून विषय पत्रिकाही काढण्यात आली. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा बर्वे यांचे पती कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ उडाली. सुदैवाने सर्वांचे नमुने निगेटिव्ह निघाले. परंतु यामुळे अध्यक्षा बर्वे यांना 14 दिवस क्वारंटाइन व्हावे लागले. ऑगस्ट महिन्यातच बाहेर पडता येणार असल्याने त्यांना सभेत सहभागी होता येणार नाही. कोरोनाचे सावट पाहता सभा पुढे ढकलण्यात यावी, अशी त्यांनी इच्छा आहे.

उपाध्यक्षसह इतर सभापती सभा घेण्याच्या समर्थनात आहेत. यातच भर म्हणजे विरोधी पक्षही सभा घेण्याच्या समर्थनात आहे. सत्ता पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये काही मुद्यांवरून कलह सुरू आहे. याचा प्रत्यय सभेच्या माध्यमातून समोर येणार असल्याची चर्चा आहे. 


सभा पुढे ढकलावी 
घरच्या व्यक्तीच रुग्ण आढळल्याने नियमानुसार 14 दिवस बाहेर जाता येणार नाही. पहिली सभा अध्यक्षांच्या उपस्थित झाली पाहिजे. सभेसंदर्भात मला उत्सुकता आहे. त्यामुळे सभा पुढे ढकलण्याची गरज आहे. तसा प्रयत्न राहिल. 
रश्‍मी बर्वे, अध्यक्ष, जि.प. 


नियमांचे पालन करून सभा होईल 
24 ला सभा होणार आहे. ती झालीच पाहिजे. सोशल डिस्टंन्सिगचे पालन करून नियमानुसान सभा होईल. 
भारती पाटील, शिक्षण व अर्थ समिती सभापती 

 
राजकारण नको 
अनेक विषय प्रलंबित आहे. सभेच्या मान्यतेशिवाय काम होणार नाही. कोरोनाची भीती ठेवत ग्रामीण भागातील विकास कामांना खिळ बसता कामा नये. यात राजकारण करण्याची गरज नाही. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सभा 24 लाच होईल. 
तापेश्‍वर वैद्य, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती 


सभा झालीच पाहिले 
सदस्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. ते मार्गी लावयचे आहेत. पाच महिन्यापासून सभा झाली नाही. निश्‍चित तारखेत सभा घेण्यासाठी आमचा आग्रह आहे. अध्यक्ष नसल्यास उपाध्यक्षांकडे जबाबदारी द्यावी. विरोधी पक्षांच्या प्रश्‍नांना घाबरून पळ काढण्यासाठी सत्ता पक्ष सभा टाळण्याच्या प्रयत्नात आहे. याला आमचा विरोध राहिल. 
अनिल निधान, विरोधी पक्ष नेते. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nagpur Crime
Nagpur Civic Issue
NMC MBBS Admission
NMRDA Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com