
नागपूर : जॉर्जिया येथील फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख विश्वविजेती ठरली. या माध्यमातून दिव्याने संपूर्ण देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केल्याचे गौरवोद्गार सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काढले. शनिवार (ता.२) रोजी सरन्यायाधीशांनी दिव्याच्या शंकरनगर येथील निवासस्थानी भेट देऊन तिचे पुष्पगुच्छ देत कौतुक केले.