
नागपूर : दहावीच्या निकालाची घोषणा संकेतस्थळावर जाहीर होताच, विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. आजचा हा निकाल मायलेकीच्या एका जोडीसाठी आनंदाचा डबल धमाका देणारा ठरला. एकीकडे २४ वर्षांनंतर आईने रात्रशाळेतून तर दुसरीकडे १५ वर्षीय मुलीने नियमित शाळेत जाऊन दहावीत उत्तीर्ण होत यश मिळविले.