Marathi Language : ‘माणसं’ अभिजात असतील तर भाषा अभिजात ठरते; अ. भा. साहित्य संमेलन गीताचे गीतकार डॉ. अमोल देवळेकर यांचे प्रतिपादन
Dr. Amol Devlekar : अ. भा. साहित्य संमेलनाच्या गीताचे गीतकार डॉ. अमोल देवळेकर यांनी ‘सकाळ’ प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भाषा तेव्हा अभिजात ठरते, जेव्हा ती जपणाऱ्या माणसांची परंपरा अभिजात असते. मराठी भाषा त्याच्या समृद्ध वारशामुळे अभिजात ठरली आहे.
नागपूर : कुठलीही भाषा-प्रदेश-संस्कृती तेव्हाच अभिजात ठरते जेव्हा तिथली माणसं अभिजात असतील. हजारो वर्षे आपला समृद्ध वारसा टिकवून ठेवणे, ज्ञानाचे वहन करणाऱ्या परंपरा जपणे, हे अभिजात असण्याचे निकष आहेत.