
नागपूर : विदर्भाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आणि पर्यावरण क्षेत्रात गेली पंचावन्न वर्षे निष्ठेने व व्रतस्थ वृत्तीने मौलिक कार्य करणाऱ्या डॉ. गिरीश गांधी यांना रविवारी (ता. १५) वरुड येथील जानकीदेवी गांधी सभागृहात मल्हारराव काळे समाजसेवा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.