Nagpur News : डॉ. मयुरी येवले यांना मँचेस्टर विद्यापीठाची फेलोशिप; आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी निवड

नागपूरच्या वैद्यकीय जनुकीय तज्ज्ञ डॉ. मयुरी येवले यांना इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठात आयोजित प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी फेलोशिप प्रदान करण्यात आली.
Dr. mayuri Yewale

Dr. mayuri Yewale

sakal

Updated on: 

नागपूर - वैद्यकीय जनुकशास्त्रातील संशोधन आणि विशेष वैद्यकीय सेवांमधील योगदानाची दखल घेत नागपूरच्या वैद्यकीय जनुकीय तज्ज्ञ डॉ. मयुरी येवले यांना इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठात आयोजित प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. १४ ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली असून, यामुळे नागपूरसह मध्य भारताच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com