
नागपूर : ‘लायकोपिन’ द्रव्य हे औषधांमध्ये ॲन्टी ऑक्सिडेन्ट म्हणून वापरले जाते. ते अतिशय महागडे असून चीन आणि जपानमधून आयात करतात. मात्र, विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या केमिकल इंजिनीअरिंगच्या प्राध्यापकांनी चक्क टोमॅटोमधून ‘लायकोपिन’ वेगळे करण्याची अत्याधुनिक पद्धत विकसित केल्याने आता ते देशातच मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि औषध कंपन्यांना चांगलाच फायदा होणार आहे.