
नागपूर : हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी’, या ओळीनुसार डॉ. सूरज मस्के आणि त्यांच्या पत्नी जानकी गरजवंतांना आरोग्यसेवा देत आहेत. जिथे खऱ्या अर्थाने सेवा देण्याची गरज आहे, अशा चंद्रपूर जिल्ह्याच्या दुर्गम सावली तालुक्यातील गेव्हरा बूज गावात हे दाम्पत्य गेल्या चार वर्षांपासून स्वतःचा दवाखाना थाटून गोरगरिबांच्या जखमांवर फुंकर घालीत ‘सापडेना वाट ज्यांना होऊ तयांचे सारथी’ हे ब्रीद जपत आहेत.