Operation Sindoor : ‘आकाशतीर’कडे जग आकर्षित होईल; ‘डीआरडीओ’प्रमुखांचा विश्वास, पाकविरुद्ध यशस्वी कामगिरी
Akash Teer : ऑपरेशन सिंदूर मोहिमेत यशस्वी ठरलेल्या ‘आकाशतीर’ हवाई सुरक्षा प्रणालीमुळे इतर देश याकडे आकर्षित होऊ शकतात. डीआरडीओ प्रमुख समीर कामत यांनी भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेवर विश्वास व्यक्त केला.
नागपूर : ऑपरेशन सिंदूर मोहिमेदरम्यान स्वदेशी रूपाने विकसित केलेल्या ‘आकाशतीर’ हवाई सुरक्षा प्रणालीचे यश पाहता अन्य देश या प्रणालीकडे आकर्षित होऊ शकतात, असा दावा ‘डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला.