esakal | अरे व्वा... संक्रमणकाळात तिप्पट वाढले ई-बुक वाचन, तब्बल एवढ्या देशातील वाचकांकडून प्रतिसाद 
sakal

बोलून बातमी शोधा

E-book reading tripled during Corona's lock down

कोरोनाचे संकट जगाच्या अंगवळणी पडले आहे. साडेचार महिन्यांच्या कालखंडानंतर मराठी ग्रंथ व्यवहाराची समीकरणे तर झपाट्याने बदलली आहेत. या काळात पुस्तकांची दुकाने, ग्रंथालये बंद राहात असल्याने नियमित वाचन करणारा वाचक वर्ग डिजिटल वाचनाकडे वळला आहे.

अरे व्वा... संक्रमणकाळात तिप्पट वाढले ई-बुक वाचन, तब्बल एवढ्या देशातील वाचकांकडून प्रतिसाद 

sakal_logo
By
मनीषा मोहोड

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी साधारणत: साडेचार महिने लाॅकडाऊन होते. ग्रंथालये लाॅक असल्याने ई-बुक वाचण्याचे प्रमाण तिप्पट वाढले. भविष्यात वाचक हा पर्याय अधिक स्वीकारण्याची शक्यता आहे. डिजिटल क्रांतीने मराठी ग्रंथ व्यवहारात आमूलाग्र बदल झाल्याने लेखक आणि प्रकाशकांनी डिजिटल माध्यमांकडे लक्ष केंद्रित केले आहे. आज या ई-बुक माध्यमातून २७ देशांत विखुरलेले मराठी बांधव वाचनाचा आनंद घेताहेत.

कोरोनाचे संकट जगाच्या अंगवळणी पडले आहे. साडेचार महिन्यांच्या कालखंडानंतर मराठी ग्रंथ व्यवहाराची समीकरणे तर झपाट्याने बदलली आहेत. या काळात पुस्तकांची दुकाने, ग्रंथालये बंद राहात असल्याने नियमित वाचन करणारा वाचक वर्ग डिजिटल वाचनाकडे वळला आहे. ई-बुक ही संकल्पना काही वर्षांपासून विस्तारत असली तरी लॉकडाऊन कालावधीत तिला अधिक गती मिळाली.

अधिक माहितीसाठी - नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा
 

आता या ई-बुक संकल्पनेकडे लेखक व प्रकाशन संस्थाही वळत असल्याने मराठी ई-बुकमध्ये नवनवीन पुस्तकांची भर पडत आहे. कोरोनाकाळात ई-बुक वाचनाचे प्रमाण तिप्पट झाले आहे. त्याचे कारण शाळा, महाविद्यालये व ग्रंथालये बंद हाेती. ती अजूनही बंदच आहेत. वेळ घालवायचा कसा, असा प्रश्न वाचकांसमाेर हाेता. त्यास आता ई-बुकचा पर्याय मिळाला आहे.

मराठी, इंग्रजीतील भयकथा, चरित्रकथा, बालकथांना वाचक


स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांना बुक स्टॉल, शैक्षणिक ग्रंथालये व सार्वजनिक ग्रंथालये बंद असल्याने अनेकांना ई-बुकचा आधार वाटतो. ई-बुकच्या माध्यमातून स्पर्धात्मक पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकांसह भयकथा, चरित्र कथा, श्यामची आई, बालकथा, ऐतिहासिक पुस्तके व इतर गाजलेल्या ई-पुस्तकांना अधिक मागणी आहे. आता कुठे तरी प्रभावीपणे ई-बुकसाठी यंत्रणा उभी राहात आहे. पण येणाऱ्या काळात मराठी साहित्य जगभर खुले होईल, असा विश्वास प्रकाशकांना वाटताे.

हजारो ई बुक्स उपलब्ध


ई बुकमुळे जगभर विखुरलेल्या मराठी वाचकांना मराठी पुस्तकांचा खजिना उपलब्ध झाला आहे. कॉपी किताब, फ्लिपकार्ड, अमेझॉन, बुक गंगा आदी ठिकाणी हे ई-बुक उपलब्ध आहे. नागपूर शहरातील विविध प्रकाशकांकडून हजारच्या वर ई पुस्तके उपलब्ध आहेत.

आर्थिकदृष्ट्या परवडणारे माध्यम


व्यावहारिकदृष्ट्या पुस्तक छपाईपेक्षा ई-बुक लेखक, प्रकाशक आणि वाचक यांना सहज परवडणारे आहे. त्यामुळे भविष्यात मराठी साहित्याचे डिजिटल स्वरूप विस्तारित होण्याची शक्यता आहे. पुस्तक हाती घेऊन वाचण्याचा आनंद निराळा असतो, असे सांगणाऱ्यांनीही आता डिजिटल पर्याय स्वीकारला आहे. ई-बुकद्वारे कुठेही सहजतेने वाचण्याची सुविधा वाचकांना आकर्षित करणारी ठरतेय.

ई बुक्सचा पर्याय सुविधेचा
लॉकडाऊनमध्ये त्याच त्याच कोरोनाच्या बातम्या वाचून आणि ऐकून कंटाळा आला तेव्हा ई बुक्सचे वाचन वाढविले. त्यानंतर जणू छंद लागावा असे नवनविन पुस्तके विविध वेबसाईडवर उपलब्ध झाल्याने, जणू वाचनाची मेजवाणीच मिळाली. कूळ पुस्तकाच्या निम्मे किमतीत काही ई-बुक उपलब्ध असल्याने, खिशालाही परवडण्याजोगे आहे.
कांचन आवारे, नागपूर. 

loading image
go to top