शेतकरी करू शकणार ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंदणी

शेतकरी करू शकणार ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंदणी

नागपूर : महसूल विभागाने पीक पाहणीसाठी ई-पीक पाहणी या स्वतंत्र मोबाइल अप्लिकेशनची निर्मिती केली आहे. जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शेतकरी ई-पीक पाहणी ॲपव्दारे पिकांची नोंदणी करू शकतील. यामुळे पिकांचे जिल्ह्यातील अचूक क्षेत्र कळणार आहे. तरी महसूल विभाग आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करावा असे, आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी मंगळवारी दिले.

बचतभवन येथील ई-पीक पाहणी कार्यक्रमासंबंधी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपजिल्हाधिकारी महसूल सुजाता गंधे, उपजिल्हाधिकारी राजशिष्टाचार जगदीश काटकर उपस्थित होते. ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय संनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या आहेत. याशिवाय पूर्ण वेळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आला आहे.

शेतकरी करू शकणार ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंदणी
सर्वांत लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होणार

शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पिककर्जही दिले जाते. शेतकऱ्यांना ॲपव्दारे पिकाची रिअल टाइम नोंदणी करायची आहे. या मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे.

अचूक भरपाई आणि मदत देणे शक्य

पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पिककर्ज मिळण्यातही सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com