Nagpur Weather: पूर्व विदर्भात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

East Vidarbha Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होत असल्याने पुढील आठवड्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Cloudy Skies and Possible Rain Expected in Nagpur and Other East Vidarbha Districts Next Week Amid a Developing Cyclonic System.

Cloudy Skies and Possible Rain Expected in Nagpur and Other East Vidarbha Districts Next Week Amid a Developing Cyclonic System.

esakal

Updated on: 

नागपूर : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होत आहे. या बदलामुळे पुढील आठवड्यात पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ३२. ६ अंश सेल्सिअस आज नागपूरचे तापमान नोंदविण्यात आले. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उपसागरातील वादळामुळे बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने सरकत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com